नंदुरबार | प्रतिनिधी
मध्यप्रदेशातील इंदोर येथे संपन्न होणार्या भारतीय प्रवासी दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रतीक माधव कदम याला भारत सरकार युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले असून प्रतीक कदम भारतीय प्रवासी दिनानिमित्त आयोजित संमेलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे .
दरवर्षी नऊ जानेवारी रोजी भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जातो .यावर्षी आठ ते दहा जानेवारी २०२३ दरम्यान मध्य प्रदेशातील इंदोर येथे प्रवासी दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करनार आहेत तर भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु समारोपाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी युगाणा देशाचे राष्ट्रपती मोहम्मद इरफान अली,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ,देशाचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर, केंद्रीय युवा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व अनेक उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रवासी दिवसाच्या या संमलनासाठी ५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा प्रवासी दिवस आठ ते दहा जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. या संमेलनात भारतातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणार्या व राष्ट्रीय सेवा योजनेच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ५० युवकांना भारतीय प्रवासी दिन सोहळ्याचे भारत सरकार युवा, कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय,नवी दिल्ली यांचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रतिक माधव कदम यास भारतीय प्रवासी दिवसाचे कार्यक्रमात विशेष निमंत्रित केल्याने तो सहभागी झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय नवी दिल्ली व रासे यो चे महाराष्ट्र गोवा रिजनल डायरेक्टर डी.कर्तिगेयन यांनी तश्या आशयाचे पत्र पाठविले आहे .