Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे रोगनिदान शिबिरात  ८५ रुग्णांची तपासणी

team by team
January 9, 2023
in आरोग्य
0
अक्कलकुवा येथे रोगनिदान शिबिरात  ८५ रुग्णांची तपासणी

खापर  | प्रतिनिधी

अक्कलकुवा येथील जामिया संस्थेच्या युनानी मेडिकल कॉलेज आणि असल्लाम रुग्णालय यांच्या वतीने  भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३८५ रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामिया संस्थेचे अध्यक्ष मौ.गुलाम मोहम्मद वास्तनवी होते.तर शिबिरासाठी सुरत येथील प्रसिद्ध लोखात रुग्णालयातील तज्ञ डॉ.वसीम मंन्सुरी,डॉ.तेजल दलाल,डॉ.साद कानुगा,डॉ.स्नेहा पटेल,डॉ.विहंगकुमार पटेल,डॉ.बिरजू पटेल,डॉ.रझ्झाक बोहरा तसेच असल्लाम रुग्णालय अक्कलकुवा येथील डॉ. आरिफ शेख,डॉ.मलहान पटेल,डॉ.फारुख शेख उपस्थित होते. वातावरणात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे, बदलत्या ऋतुमानाने लोकांचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागातील लोकांना रोगनिदानासाठी शहरात जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही.यामुळे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे व सामाजिक बांधिलकी जोपासणारे जामिया संस्थेचे अध्यक्ष मौ. गुलाम वास्तनवी यांच्या संकल्पनेने जामिया अक्कलकुवा येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात  जनरल चेकअप,कान-नाक-घास,हाडांचे आजार,स्त्रीरोग,त्वचारोग,बालरोगआदी सर्व रोगांवर तपासणी व औषधोपचार करण्यात आले.दरम्यान तब्बल ३८५ रुग्णाची तपासणी व औषधोपचार करण्यात आले.तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणार्‍या रुग्णांना शिबिरामार्फत जाणार्‍या रुग्णांना सुरत येथील लोखात रुग्णालयात शस्त्रक्रिया खर्चात ५० टक्के सूट दिली जाणार आहे.
प्रसंगी मौ.हुजैफा रंदेरा,मौ. उवेस रंदेरा,अखलाख शेख व लोखात रुग्णालयातील कर्मचारी,युनानी मेडिकल कॉलेज आणि असल्लाम रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय प्रवासी दिवसाच्या संमेलनात प्रतीक कदम निमंत्रित

Next Post

मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

Next Post
मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add