नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे शेत शिवारातून चोरट्याने पिकअप वाहनातून ४२ हजार रुपये किंमतीचा कापूस चोरु न नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बु.येथील राहूल साहेबराव पाटील यांचे वैंदाणे शिवारातील गट क्र.२८२/२ मध्ये पत्र्याचे घर आहे. सदर घरात राहूल पाटील यांनी कापूस ठेवलेला होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील पिकअप वाहनात (क्र.एम.एच.१८-९६४३) सदर घरातून ४२ हजार रुपये किंमतीचा ६ क्विंटल कापूस चोरुन नेला. याबाबत राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पिकअप वाहनातील अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनायक सोनणे करीत आहेत.








