नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही. एस. श्रीवास्तव यांना रसायनशास्रात संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे रसायनशास्रात सर्वात महत्वाचा मानला जाणारा भारतीय रसायनशास्त्र परिषदेकडून दिला जाणारा प्रो. एस. एम. एल. गुप्तां यांच्या समारणार्थ दिला राष्ट्रीय पुरस्कार 2022 पुरस्काराने नुकतेच उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, शिक्षणमंत्री देवेंद्र उपाध्याय, आग्रा विद्यापीठाचे कुलगुरू श्रीमती डॉ. आशु राणी ,भारतीय रसायनशास्त्र परिषदचे अध्यक्ष जी.सी.सक्सेना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्कारात त्यांना 15000 रुपये आंतरराष्ट्रीय सिटेशन प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले , त्यांच्या या यधबद्दल न ता वि समितीचे चेअरमन माजी आमदार चद्रकांत रघुवंशी व्हा चेअरमन मनोज रघुवंशी , संस्थेचे समन्वयक डी.एम.एस. रघुवंशी , प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, उपप्राचार्य प्रा.एन.जे सोमाणी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.








