नंदुरबार l प्रतिनिधी
तंत्रज्ञान आणि खेळणी हा मुख्य विषय घेऊन नंदुरबार तालुक्याचे चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 चे विज्ञान प्रदर्शन 11 व 12 जानेवारी 2023 या कालावधीत होणार आहे.
तालुक्यातील शेजवा येथील माध्यमिक विद्यालय शेजवा पो. पिंपळोद ता. जि. नंदुरबार येथे 11 व 12 जानेवारी 2023 नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी असा या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय असून पुढील प्रमाणे एकूण सात उपविषय देण्यात आलेले आहेत. यात माहिती आणि संप्रेषण, तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणीय चिंता, वर्तमान नवोपक्रमसह ऐतिहासिक विकास व आमच्यासाठी गणित हे सात उपविषय आहेत.
या विषयाशिवाय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळणी या मूळ संकल्पनेवर आधारित कोणतीही वस्तू प्रतिकृती वैज्ञानिक उपकरण प्रदर्शनासाठी तयार करता येणार आहे.शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी दोन गटांमध्ये विभागणी केली आहे विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील सर्व शाळांनी 9, आणि 10 जानेवारी पर्यंत शेजवा येथील माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे मुख्याध्यापकां कडे प्रत्येक शाळेने नोंदणी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघ यांनी केले आहे.








