नंदुरबार l प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणार्या विरोधी पक्षाचे अजित पवार यांच्या विरोधात आजनंदुरबार शहर मंडलात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्यास गाढवावर बसवून तसेच जोडे मारून धींड काढण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण चव्हाण, कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बूधाबाई पाटील, उद्योगाकडे जिल्हाध्यक्ष सुदाम चौधरी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत,

भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष भूपेंद्र गुरव, महिला मोर्चा प्रवेश सदस्य सविता जयस्वाल, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, शहर कोषाध्यक्ष कपिल वाघ, दिनेश नावरे, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष काजल मछले, वाहतूक सेल शहराध्यक्ष रफिक मिस्त्री, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुरैया खाटीक, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष निर्मला पगारे, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रेम पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








