नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे मासिक मिटींगमध्ये मित्रासोबत वाद का घालतो या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील कुवरसिंग झिमा गावित हे मासिक मिटींगमध्ये सतिष याच्यासोबत वाद घालतो. या कारणावरुन कुवरसिंग गावित यांना स्वप्निल जयवंत गावित याने काठीने मारहाण केली.
तसेच अमित रेमश गावित व विकास कृष्णा गावित यांनीही लाठीकाठीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कुवरसिंग गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरोधाद भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.हिदुस्थान नाईक करीत आहेत.








