नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहादा शाखेमार्फत शुक्रवारी 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला द दारूचा नव्हे द दुधाचा कार्यक्रम घेण्यात आला .
31 डिसेंबरचे औचित्य साधून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला व समाजाला निर्व्यसनी करण्यासाठी तंबाखू ,दारू, अमली पदार्थ इत्यादी कोणत्याही मादक द्रव्यांचे सेवन करणार नाही व समाज व्यसनमुक्त करण्याचे विचार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 15 डिसेंबरते 31 डिसेंबर दरम्यान व्यसन विरोधी पंधरवडा अभियान राबविले जाते.
या पंधरवड्यात व्यसनविरोधी विविध कार्यक्रम ,उपक्रम आयोजित केले जातात. शाळा, कॉलेज ,महाविद्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी समिती प्रबोधन करून ,बॅनर द्वारे व्यसनाचे दुष्परिणाम मांडण्याचा प्रयत्न करते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष हैदर नुराणी व राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आर.टी. पाटील, जायण्ट गृपचे कैलास भावसार, भूषण बाविस्कर उपस्थित होते .त्यावेळी हैदर नुरानी यांनी मनोगत व्यक्त केले.युवकांमध्ये युवतींमध्ये एकंदरीत समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनताचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर तसेच समाजावर कसे घातक आहेत हे संघटना समजवण्याचा प्रयत्न करते स्वतः आजपर्यंत गुटका व तंबाखू खाणाऱ्या 147 लोकांना शपथ घेऊन व्यसनमुक्त केल्याचा उल्लेख केला.
आर.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पवार हिने केले. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले व आभार श्रीकांत बाविस्कर यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन, श्रीकांत बाविस्कर प्रदीप केदारे, विनायक सावळे, हेमंत बोरसे ,श्री. बोड्रे,के. आर .पाडवी, श्री.वसावे , भटू वाकडे ,घनश्याम सोनवणे, चतुरभूज शिंदे, कैलास भावसार, हिम्मत खुशाल आदी उपस्थित होते.