Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बांधकाम मजुरांच्या पिकअप वाहनाचा खोकसा घाटात भीषण अपघात, दोन जण ठार, १२ मजूर गंभीर जखमी

team by team
December 31, 2022
in क्राईम
0
बांधकाम मजुरांच्या पिकअप वाहनाचा खोकसा घाटात भीषण अपघात, दोन जण ठार, १२ मजूर गंभीर जखमी

नवापूर l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील नवागाव खांटापाडा, बिजादेवी येथील बांधकाम मजूर स्लॅब भरण्यासाठी साक्री तालुक्यात गेले होते. रात्री उशिरा परत येताना ११ वाजता खोकसा घाटामध्ये मजुरांचे पिकप वाहन, मिक्सर मशीन याचा अपघात झाला आहे. तीव्र उताराच्या वळण घाट रस्त्यात पंधरा फूट खोल पिकअप व मिक्सर मशीन कोसळल्याने अनेक मजूर खाली दाबले गेले. यात दोन मजूर जागीच ठार झाले असून. दहा ते बारा मजूर गंभीर जखमी झाले आहे.

 

जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि
.३० डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता अपघात झाल्यानंतर खोकसा गावाचे पोलीस पाटील सुनील गावित व गावकरी यांनी अपघात स्थळी धाव घेऊन मदतीचे कार्य सुरू केले. पोलीस पाटील सुनील गावित यांनी 108 रुग्णवाहिका व विसरवाडी पोलीसांना माहिती देताच प्रशासन घटनास्थळी दाखल होत जखमींना वाचवण्यासाठी मदत कार्य सुरू केले.

 

 

 

जखमींना तत्काळ उपचारासाठी पिंपळनेर येथील 108 रुग्णवाहिका पायलट व डॉक्टर, विसरवाडी 108 रुग्णवाहिका पायलट सुभाष गावित व डॉ. प्रवीण गावित, नवापूर 108 रुग्णवाहिका पायलट विनोद देसाई व डॉ.राहुल सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत. जखमींना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

 

 

चिचल्ये येथील सरपंचांच्या जेसीबीची मदत घेऊन खोकसा ग्रामस्थ व विसरवाडी पोलिसांनी अपघातात वाहनाखाली दबलेल्या मजूरांना बाहेर काढून मदत केली. रात्री उशिरा तीन वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते.

 

 

विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, हेड कॉन्स्टेबल हिंदुस्थान नाईक, हेड कॉन्स्टेबल हेमंत खाडे, पोलीस नाईक राजू कोकणी व त्यांचे पथक. अपघात स्थळी दाखल झाले होते. सदर अपघाताबाबत अधिक कार्यवाही विसरवाडी पोलीस करीत आहे.

 

 

 

जखमी मजूरांची नावे प्रीतम विक्रम गावित वय 17, सरिता विक्रम गावित वय 30, संतोष बन्सी गावित वय 20, ईश्वर रामदास गावित वय 30, बन्सी रेवा गावित वय 58, अश्विन दिलीप वळवी वय 30 सर्व रा. नवागाव खांटापाडा, किसन सदाशिव सोनवणे वय 18, किस्मत सदाशिव सोनवणे वय 16, निलेश धरमदास देसाई वय 32 सर्व रा. बिजादेवी तालुका नवापूर हे मजूर जखमी झाले असून. त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अनिता दिलीप गावित ( वय 25 ) व सुमित्रा मोहन गावित (वय 45) रा. नवागाव खांटापाडा या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

 मोबाईल वापरल्याचे आश्रमशाळेत मारहाण, मुलीने केले पिक फवारणीचे औषध प्राशन

Next Post

अनिसतर्फे ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा उपक्रम

Next Post
अनिसतर्फे ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा उपक्रम

अनिसतर्फे 'द' दारूचा नव्हे 'द' दुधाचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add