नंदुरबार l
तालुक्यातील जोगणीपाडा आश्रमशाळेत मोबाईल वापरल्याच्या कारणावरुन मुलीला मारहाण व वाईट शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन मुलीने पिक फवारणीचे औषध प्राशन केले. याप्रकरणी व्यवस्थापकासह वार्डनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील जोगणीपाडा येथील आश्रमशाळेतील कल्याणी सुकराम गवळी या मुलीने आश्रमशाळेत मोबाईल वापरला. या कारणावरुन वार्डन चारुशिला मॅडम यांनी कल्याणीला रागवत आश्रमशाळेत मोबाईल वापरण्यास मनाई आहे असे सांगत मुख्याध्यापक राजपूत यांच्या ऑफिसला घेवून गेली.
तेथे व्यवस्थापक पवार यांनी कल्याणीला रागाने गालावर, पाठीवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली. सदर प्रकाराने कल्याणीला मानसिक त्रास झाल्याने वासदरा येथे तिच्या राहत्या गावी शेतात जावून पिक फवारणीचे औषध प्राशन केले. याबाबत कल्याण गवळी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात वार्डन चारुशिला व व्यवस्थापक पवार यांच्याविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ३४ सह बालकांचे काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.








