नंदुरबार l प्रतिनिधी
तोरणमाळ ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत झापीच्या मांजणीपाडा येथील रेसला पावरा यांच्या कौलारू घरावर वीज कोसळली . यात भटी रेसला पावरा (वय ८ ) ही बालिका जखमी झाली असून एक शेळी ठार झाली आहे . वीज पडून जखमी झालेली भटी रेसला पावरा या मुलीला बांबूची झोली करून खडकी येथील खाजगी डॉक्टरकडे नेण्यात आले .रेसला पावरा यांच्या घराचे ही नुकसान झाले . सौरऊर्जा प्लेटा आदींचे ही नुकसान झाले आहे . बांबूची झोळी करून भटी हिस आमशा जुवानसिंग पावरा , रुपसिंग ऊतराण्या नाईक , भुरसिंग हिगऱ्या पावरा , राधू जामसिंग पावरा यांनी मदत केली . मुलीची प्रकृती बरी असल्याचे आमश्या पावरा यांनी सांगितले . झापी दवाखान्यात डॉक्टर राहत नाही . यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जावे लागते . झापी येथे कायमस्वरूपी डॉक्टर असला पाहिजे , अशी मागणी करण्यात येत आहे.