तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील गुऱ्हाळ मालक, खांडसरी, कारखान्या मार्फत उचल व अंतिम रक्कम जाहीर करावी यासाठी एकलव्य आदिवासी युवा संघटनेने निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता चर्चा व तोडगा काढण्यासाठी तहसीलदारांचा दालनांत बैठक झाली.
एकलव्य आदिवासी संघटना व गुऱ्हाळ व खांडसरी व कारखान्याच्या प्रतिनिधींची व संघटना पदाधिकारी,शेतकरी यांची तहसीदार दालनात बैठक घेण्यात आली त्यात ऊसतोड,उचल,पैसे यावर चर्चा झाली.दि 1जाने पासून गुऱ्हाळ मालकांनी 100 रु प्रतिटन वाढ केली मात्र खंडसरी कारखाना मालकांनी वाढ करण्यास असमर्थता दाखविली आहे .
बैठकीस साखर आयुक्तलयाचे लेख परीक्षण समितीचे संदीप पाटील, गुजर,आयन कारखान्याचे कृषिअधिकारी अरविंद पाटील राजेंद्र पाटील, जनार्दन पाटील, सातपुडा कारखाना चे शेतकी अधिकारी अजित सावंत, श्रीकृष्ण खंडसरीचे प्रतिनिधी हिमेश कलाल, आदीसह गुऱ्हाळ मालक व एकलव्य आदिवासी युवा संघटना प्रवक्ते अँड गणपत पाडवी शहराध्यक्ष विनोद पाडवी, तालुकाध्यक्ष दिनेश पाडवी, उपाध्यक्ष अरविंद प्रधान, उमेश वसावे सुरेश वळवी, सुनील वळवी, फत्तेसिंग नाईक, टेडग्या वळवी, गोविंद नाईक, मनेश नाईक, शंकर मोरे आदींसह पाच गुऱ्हाळ मालक उपस्थित होते.
दरम्यान गुऱ्हाळ मालकांनी 100 रु दर वाढवत 2100 रु प्रतिटन दर दिं 1 पासून देणार आहे खांडसरी व कारखाने यांनी वाढ न केल्याने संघटनेमार्फत आंदोलन छेडणार असल्याचे संघटना प्रवक्ता गणपत पाडवी यांनी सांगितले.








