Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

नंदुरबार येथे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन

team by team
December 29, 2022
in शैक्षणिक
0
अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

नंदुरबार | प्रतिनिधी

स्पर्धेत हारणे-जिंकणे इतकेच महत्वाचे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्पर्धेमध्ये नेहमी बेस्ट देणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्या नुतनवर्षा वळवी यांनी केले. ते येथील शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस.ए.मिशन हायस्कूल येथे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडे भटू बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी, डॉ.सुनिता अहिरे, नरेंद्र माळी, विवेक पालीकर, पदमेश माळी आदी उपस्थित होते. स्पर्धेत १४ वर्षा आतील मुली गटात खुशी प्रफुल पाटील, जान्हवी महेंद्र पवार, १७ वर्षा आतील गटात वैष्णवी आहेर, रीना बैसाने, मयुरी पिंगळे, नेहा बोराणे, स्नेहल पवार यांनी यश संपादन केले.

विजयी स्पर्धकांची दि.८ ते १० जानेवारी २०२३ दरम्यान  मिनाताई ठाकरे संकुल, नाशिक येथे होणार्‍या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील जवळ पास १५ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी पंच म्हणून योगिता बैसाणे, प्रतिक खंडेलवाल, पवन सर, कॉर्नर रेफ्री म्हणून अमित पाडवी, याकूब मोहम्मद, विशाल सोनवणे, गणेश गोसावी तर टेबल जज म्हणून मोहित सोनवणे, लिना पंडीत, दिपीका रामोळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे निरीक्षण असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सचिव गणेश मराठे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

वैजाली येथे शिक्षण परिषद उत्साहात 

Next Post

ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा आदिवासी युवा संघटनेचा इशारा

Next Post
ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा आदिवासी युवा संघटनेचा इशारा

ऊस दराबाबत तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा आदिवासी युवा संघटनेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add