नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील उमटीचा बोरीपाडा येथील भिमसिंग गोरजी तडवी हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ पी ४४४७) मोलगी येथून आठवडा बाजार करुन घरी परत जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून मोलगी गावापासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या अजय पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला धडक दिल्याने भिमसिंग तडवी यांचा मृत्यू झाला.
याबाबत राजेंद्र गोरजी तडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालाविरोधात भादंवि कलम ३०२(अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.आधार सोनवणे करीत आहेत.








