नंदुरबार :l
नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्यावर रात्रीच्या सुमारास धाक दाखवून सहा लाखाचा ट्रक व १० हजाराचा मोबाईल लांबवून नेल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव येथील सिद्धार्थ कचरु पगारे हे त्यांच्या ताब्यातील १० टायर ट्रक (क्र.एम.एच. ४१ जी ६५९०) घेवून नंदुरबार ते दोंडाईचा रस्त्याने जात होते. यावेळी ओंकार केदार व दोन अनोळखी इसमांनी ट्रक अडवून सिद्धार्थ पगारे यांना चापट मारुन धाक दाखवित सहा लाखाचा ट्रक व १० हजार रुपयांचा मोबाईल लांबवून नेला. याबाबत सिद्धार्थ पगारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल कर ण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.








