तळोदा l प्रतिनिधी
कुंभार गल्ली, भोई गल्ली व जोहरी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा शहरात कुंभार गल्लीत भारतीय सैनिकांना शैर्याला शत शत नमन करीत एक दिवा शहीद वीर जवानांनासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला.यावेळी देशभक्तीमय वातावरणात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

उत्तर सिक्कीममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या भागात लष्कराच्या ट्रकचा अपघात झाल्याने 16 जवानांचा शहीद झाले.
तळोदा येथे देशभक्तीमय वातावरणात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भारत माता की जय , वीर जवान अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस युवराज चव्हाण , नाना वसावे, तालुका भोईसमाज अध्यक्ष धनलालजी शिवदे उपाध्यक्ष चंदू सोनवने,प्रकाश ,मणीलाला कुंभार ,नारायण शिवदे,शिवदास,साठे,संतोष जोहरी,आनंद मराठे,सुधाकर जोहरी महिला बेबीबाई सोनवणे,राणू बाई शिवदे,संगीताबाई जोहरी,उशाबाई भोई ,माया जोहरी,अहिल्या कुंभार,सीमाबाई ढोले आदी उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचलन प्रकाश वानखेडे तर आभार चंद्रकांत भोई यांनी केले. यावेळी कुंभार गल्ली, भोईगल्ली, जोहरी गल्लीतील महिला मंडळ व जेष्ठ नागरिक व युवती युवक उपस्थित होते. कार्यक्रमात मयुर ढोले जयेश कुंभार,नीरज भोई ,तुषार जोहरी किशोर कुंभार ,भैय्या जोहरी, चेतन जोहरी,राहुल सोनवणे ,मयुर कुंभार,चिंटू जोहरी,सचिन भोई गिरीश भोई , मयुर भोई ललित ढोले आदींचे सहकार्य लाभले.








