नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनची निमा फोरम ची नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विद्या चौधरी व सेक्रेटरी पदी डॉ. निलोफर शेख यांची निवड करण्यात आली. नंदुरबार शहरातील साई केअर हॉस्पिटल मध्ये काल नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन बैठक घेण्यात आली या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) फोरम च्या महिला अध्यक्षपदी डॉ. विद्या चौधरी व सेक्रेटरी पदी डॉ. निलोफर शेख यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी डॉ. विलास दानेज , डॉ. मनोज तांबोळी,डॉ. अजय शर्मा ,डॉ. संदीप चौधरी ,डॉ. चेतन चौधरी, डॉ. प्रियंका चौधरी,डॉ. किर्ती सुर्यवंशी आदि उपस्थीत होते.