म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र व गुजरात रस्त्याच्या प्रकाशा तळोदा रस्त्यावर असलेले सिद्धिविनायक पेट्रोल पंपजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
तळोदा तालुक्यातील चौगाव मोरवड येथून ऊस भरून ट्रॅक्टर ट्रॉली गुजरात राज्यातील दसवड येथील खांडसरी कारखान्या ला जात असताना रात्रीच्या सुमारास रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने पलटी झाली ही ट्रॅक्टर ट्रॉली भर रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाली रात्री च्या सुमारास पलटी झाल्याने काहीकाळ वाहतूक रस्त्याच्या बाजूने जात आहे
.तळोदा ते प्रकाशा रस्त्याची खूपच दुरावस्था झाली आहे या राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ सुरू असते या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली तरी देखील रस्ता दुरुस्ती होत नसल्याने वारंवार लहान मोठे अपघात होत असतात या रस्त्यावर अनेक वेळा ऊसाने भरलेले वाहन पलटी होऊन शेतकऱ्याचे नुकसान होत असते प्रकाशा ते तळोदा हा रस्ता खूपच खराब झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होत असतात तरी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मांगणी शेतकऱ्यांसह वाहन धारकांना केली आहे.








