नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील तीसी येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलतर्फे लोकनियुक्त सरपंचपदासाठी दिलीप पोपट पाटील यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.

नंदूरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी काल दि. २० डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयात मतमोजणी झाली. तालुक्यातील तीसी येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली.मात्र निकाल निकाल हा एकतर्फी लागला असून शिवसेना शिंदे गटाचे ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदासाठी दिलीप पोपट पाटील यांना २३३ मते पडली असून ते तब्बल ७९ मतांनी विजयी झाल्याने.तीसी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी दिलीप पोपट पाटील विजयी झाले आहेत.

तर ग्रामविकास पॅनलतर्फे रेखाबाई किशोर पाटील, गायत्री हर्षल पाटील, बारकु बायसिंग भील,रतन चिंतामण भील, सोनिबई राजू पवार, संजय निंबा पाटील हे सात सदस्य विजयी झाले.विजयी झालेल्या सरपंच दिलीप पोपट पाटील यांच्यासह सदस्यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी लोकनियुक्त सरपंच दिलीप पोपट पाटील यांची भेट घेत सत्कार केला.








