नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2022~23 चे वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार विविध कला प्रकारांनी संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परीक्षित मोडक तर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सराफ, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारणी सदस्य श्रीराम मोडक, पंकज पाठक, जनरल बॉडी सदस्य विपुल दिवाण, परीक्षक म्हणून नागसेन पेंढारकर व राहुल खेडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, नटराज मूर्ती चे पूजन, दीप प्रज्वलन संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सराफ यांनी कलाविष्कार हा जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत आपल्या कलेचे नैपुण्य दाखवायलाच हवे. यातूनच उद्याचे कलाकार घडतात असे सांगून कलाविष्कार या स्नेहसंमेलनास शुभेच्छा देऊन उद्घाटन झाले असे जाहीर केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कलाविष्कार या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कराओके ट्रॅक वर गीतगायन, वैयक्तिक व समूह नृत्य, मराठी हिंदी इंग्रजी नाटिका, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, विनोद, चुटकुले, बातम्या इत्यादी कलाप्रकार सादर करून सर्व कलारसिकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला शाळेतील शिक्षक पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वेगवेगळी बक्षिसे जाहीर केले. संस्थेचे उपाध्यक्ष राहुल पाठक यांनी स्नेहसंमेलनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना अकराशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले तर तसेच शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे यांनी स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व 215 विद्यार्थ्यांना श्यामची आई हे पुस्तक गिफ्ट म्हणून देणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी यांनी सामूहिक नृत्य करून विद्यार्थ्यांमध्ये समरूप होऊन स्नेहसंमेलना चा आनंद लुटला. परीक्षकांनी स्नेहसंमेलनचा अंतिम निकाल जाहीर केला. यात
गीत गायन स्पर्धा
प्रकारात स्वप्निल खैरनार (8 वी क) प्रथम तर वैभव वाल्हे (9 वी क) यास द्वितीय क्रमांक मिळाला. तर विशेष पारितोषिक मोहित सोनवणे (7वी ड) यास प्रदान करण्यात आले.
फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक पवन पाटील (7वी ब) तर द्वितीय क्रमांक महेश पगारे (9वी ब) यांना प्राप्त झाला.
*समूह नृत्य* प्रकारामध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण बाटुंगे व ग्रुप, लक्ष्मी नृत्य तर द्वितीय क्रमांक तनिष वळवी व ग्रुप, जोगवा नृत्य व तृतीय क्रमांक कौस्तुभ पाटील व ग्रुप, शिव तांडव नृत्य तर उत्तेजनार्थ पारितोषिक देशभक्तीपर गीत, द्वारकाधीश घमंडे व ग्रुप यांना मिळाला.
वैयक्तिक नृत्य या कलाप्रकारात प्रथम क्रमांक कीर्ती कुमार लोहार (8वी ई) लावणी, तर द्वितीय क्रमांक हर्षवर्धन शिंदे (6वी ड) झिंगाट यास द्वितीय क्रमांक मिळाला.
नाटिका कलाप्रकारात प्रथम क्रमांक रोहित पवार व ग्रुप, हिंदी नाटिका, युवा क्रांती के शोले… तर द्वितीय क्रमांक प्रणील सोनवणे व ग्रुप, इयत्ता 10 वी ई, मराठी नाटिका, आम्ही ई तुकडीचे मानकरी यांनी पटकावला.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन प्रमुख हेमंत खैरनार, कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी, नृत्य शिक्षक राहुल टिळंगे, योगेश गवते, दिनेश वाडेकर, भरत पेंढारकर, प्रशांत पाटील, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मच्छले यांनी केले तर साऊंड सिस्टिम याचे संपूर्ण नियोजन मास्टर राजेश मच्छले यांनी बघितले.








