तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील राजवीहीर येथील स्थापनेपासून काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपाचे आकाश सतीश वळवी यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह नऊ सदस्य दणदणीत विजयी होऊन सत्ता परिवर्तन झाले आहे. ६४ वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली आहे.
तळोदा तालुक्यातील राजवीहीर ग्रामपंचायतची स्थापना १९५९ पासून झाली आहे. तेव्हा पासून येथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रथमच भारतीय जनता पक्षाचा पॅनलने याठिकाणी मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला आहे.
मंगळवारी स. १० वा. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांच्या यांचा प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी एस.एन. सरगर यांनी मतगणनेचे कामकाज पाहिले. त्यात भाजपाचे सरपंच उषा आकाश वळवी यांच्या विजय झाला.
तर सदस्य पदी प्रकाश प्रतापसिंग पाडवी, शारदाबाई प्रकाश नाईक, सावित्री धर्मेंद्र वसावे, अंजुबाई लक्ष्मण पाडवी, चेतन यशवंत पाडवी, मंगलसिंग धरमसिंग पाडवी, गुलाबसिंह जेहरा पाडवी, सुमनबाई जितेंद्र पाडवी, सरला अनिश वळवी यांचे दणदणीत विजय झाला आहे.
तर राजविहीर ग्रामपंचायत मध्ये भाजप व पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल तर काँग्रेसचे ग्रामविकास पॅनल मध्ये सरळ लढत होती. चुरशीच्या लढतीत भाजपाने माजी जि. प.सदस्य सतीश वळवी व माजी पंचायत समिती सभापती आकाश सतीष वळवी यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवून यश संपादन केले. तर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली आहे. तर ग्रामविकास पॅनलच्या पराभव पत्करावा लागला.








