नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्या १२३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. यातील ६ ग्रामपंचायती माघारीअंती बिनविरोध झाल्या असून उद्या दि.१८ डिसेंबर रोजी ११७ ग्रामपंचायतीसाठी ४१२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३९४ तर सदस्य पदासाठी २ हजार ४५४ उमेदवारांसाठी १ लाख ८३ हजार ३८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दुसर्या टप्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्या १२३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत असून बिनविरोध ग्रामपंचायत वगळता ११७ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डनेल, मनीबेली, मोलगी, भगदरी, भाबलपुर, घंटाणी, विरपुर, सोरापाडा, अलीविहिर, बिजरीगव्हाण, खटकुणा, टावली, मंडारा, खाई, कौलीमाळ, कंकाळमाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, ओहवा, वेली, उमरगव्हाण, चिवलउतार, माळ या ३० ग्रामपंचायतींसाठी ११९ मतदान केंद्रे असून यात २९ हजार २५६ महिला मतदार व २९ हजार ८९६ पुरूष मतदार तर इतर १ असे ५९ हजार १५३ मतदार असणार आहे. या ३० ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी १०७ तर सदस्य पदासाठी ७२४ उमेदवार रिंगणात आहे.
अक्राणी तालुक्यातील मांडवी बु. मक्तारझिरा,मांडवी खु, वावी, जुगणी, भमाणे, भाबर, उडद्या, राजबर्डी, कुवरखेत, कात्रा, तेलखेडी, कुकलट, शेलकुई, वलवाल, केलापाणी, खडकी,फलाई, भादल, कुंडया, रोषमाळ खुर्द, कुंभरी, थुवाणी, डुडल, कुकतार, डोमखेडी, गेंदा, माळ, खुटवाडा, पिपंपळबारी, चांदसैली,बिजरी, गोया, कामोद खु.,चिखली, बिलगांव, त्रिशुल. या ४४ ग्रामपंचायतीसाठी १३९ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून यात २५ हजार १२८ महिला तर २५ हजार ९१० असे एकूण ५१ हजार ३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या ४४ ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी १४६ तर सदस्य पदासाठी ८५४ सदस्य रिंगणात उभे आहे. तळोदा तालुक्यातील उकमेव राजविहिर ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून ३ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात ९११ महिला तर ८४५ पुरूष असे एकूण १ हजार ७५६ मतदार हक्क बजावणार आहे. यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी १८ सदस्य आहे.
शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, निंभोरा, बहिरपूर, बिलाडतर्फे हवेली, म्हसावद, धांद्रे बु., पाडळदे बु., कलमाडीतर्फे बोरद, जीवनगर या १० ग्रामपंचायतीसाठी ४० मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून ९ हजार ५७९ महिला तर ९ हजार ८६४ पुरूष असे एकूण १९ हजार ४४३ मतदार आहे. या १० ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ३९ तर सदस्य पदासाठी १६६ उमेदवार रिंगणात आहे.
नवापूर तालुक्यातील शेई, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, वन्हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, करंजवेल, वाटवी (नवनिर्मित), पाटी बेडकी, या १५ ग्रामपंचायतीसाठी ५२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून ११ हजार ७०५ महिला व ११ हजार २२० पुरूष असे २२ हजार ९२५ मतदार मतदान करणार आहे. या १५ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ५३ तर सदस्य पदासाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहे.
नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बु., रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली या १७ ग्रामपंचायतीसाठी ५९ मतदान केंद्रा असून १४ हजार ५५७ महिला तर १४ हजार ५११४ पुरूष मतदार असे एकूण २९ हजार ७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या १७ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४७ तर सदस्य पदासाठी ३१८ उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतींसाठी ४१२ मतदान केंद्रावर लोकनियुक्त सरपंचपदाचे ३९४ तर सदस्य पदाचे २ हजार ४२९ उमेदवारांचे भवितव्य १ लाख ८६ हजार ३८६ मतदार भवितव्य ठरविणार आहे. निवडणुकीची तयारी प्रशासनातर्फे पूर्ण करण्यात आली असून आज प्रत्येक तालुक्यातील तहसिल कार्यालयामधून मतदार कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. जिल्ह्यात एकूण ४१२ मतदान केंद्रे आहेत. यात चार मतदान अधिकारी, कर्मचारी तर दोन पोलीस कर्मचारी असे ६ जणांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.








