Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नऊ गावांमध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असणार मतदान

team by team
December 18, 2022
in राज्य
0
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील आज  मतदान होणाऱ्या ११७ ग्रामपंचायतींपैकी धडगाव तालुक्यातील पाच व अक्कलकुवा तालुक्यातील चार अशा अतिदुर्गम भागातील नऊ गावांसाठी सकाळी ७:३० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे.
धडगाव तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील उडद्या, भादल,भमाणे, सावऱ्यादिगर व भाबरी या गावातून परततांना नदीतून प्रवास करावा लागतो.तसेच काही अंतर जंगलातूनदेखील चालावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना सायंकाळी मतदान संपल्यानंतर परततांना रात्र होत होती.यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी निवडणूक आयोगाला अहवाल पाठविला होता.त्यानुसार मतदानाच्या वेळेत बदल करण्याचे नमूद करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांचे हाल होवू नयेत तसेच रात्री परततांना संभाव्य अडचणी लक्षात घेवून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे धडगाव तालुक्यातील नमूद गावांमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.तसेच अक्कलकुवा तालुक्यातीलदेखील चार गावांचा समावेश आहे.यात नर्मदा किनारपट्टीवरील मनिबेली,डणेल, धनखेडी व जामठी या गावांचा समावेश आहे.सदरच्या चार गावांमध्ये दुपारी ३:३० वाजेपर्यंत मतदारांना हक्क बजाविता येणार असल्याची माहिती तहसिलदार रामजी राठोड यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाने केले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Next Post

जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Next Post
जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add