Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

team by team
December 16, 2022
in क्राईम
0
फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

नंदूरबार  |  प्रतिनिधी
नंदुरबार येथुन शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असुन त्यांच्या ताब्यातुन  २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ११ ते १२ डिसेंबर दरम्यान उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील आडची गावातील आमराळे शिवारातील विश्वनाथ शिवनाथ वळवी यांचे शेतातील विहीरीमधुन १० हजार रुपये किमतीची एक पाण्याची मोटार अज्ञात आरोपीतांनी लपास केल्याने उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शेतातील पाण्याची मोटार चोरणारे करणसिंग वळवी, रा. लहान राजमोही ता. अक्कलकुवा याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेली असून चोरी केलेल्या पाण्याच्या मोटार ते नंदुरबार येथे ऍपेरिक्षामध्ये भरून विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरतील नवापूर चौफुली परिसरात सापळा रचला. दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास नवापूर कडून नंदुरबारकडे एक संशयीत ऍॅपेरिक्षा येतांना दिसली. पथकाने ऍपेरिक्षा चालकास हाताचा इशारा करून थांबविली. ऍपेरिक्षामध्ये असलेल्या चालक करणसिंग, रविदास वळवी रा. लहान राजमोही, ता. अक्कलकुवा, जय नेहरू पाडवी  रा. वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा हे आढळुन आले.ऍॅपे रिक्षाची पाहणी केली असता, रिक्षाच्या मागील बाजूला प्लास्टीकच्या गोण्या दिसून आल्या. प्लास्टीकच्या गोण्याबाबत रविदास वळवी, जय पाडवी यांना विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले. म्हणून पथकाने त्या गोण्या उघडून पाहिले असता त्यात पाण्याच्या मोटारी दिसून आल्या. पाण्याच्या मोटारी कोठून आणल्या व कोठे घेवून जात आहेत याबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे देवू लागले म्हणून पथकाने दोन्ही संशयीत इसमांना अधिक चौकशीकामी स्थानिक गुन्हे शाखा येथे आणले.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयीत इसमांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी मागील काही काळात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका, तळोदा, अक्कलकुवा इत्यादी परिसरातून गावाच्या शेतांमधील विहीर व बोअर वेलमधून पाण्याच्या मोटार चोरुन त्या विक्री करण्यासाठी नंदुरबार येथे येत असल्याचे सांगितले. मिळून आलेल्या पाण्याच्या मोटारींबाबत नंदुरबार जिल्ह्यातील उपनगर पोलीस ठाणे, अक्कलकुवा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे येथील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता तेथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयीत इसमांच्या ताब्यातून ८१ हजार रुपये किमतीच्या ६ पाण्याच्या मोटारी व २ लाख रुपये किमतीची चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी ऍपेरिक्षा (क्र.जी.जे.-०४, टी  ४८७९) असा एकुण २ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून

 

 

 

 

 

आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, पोलीस नाईक मनोज नाईक, सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागुल, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई शोएब शेख, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मारहाण प्रकरणी एकास न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा

Next Post

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

Next Post
हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add