Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

team by team
December 16, 2022
in सामाजिक
0
हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी-

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून, हलाल प्रमाणपत्राचा पैसा कुठे जातो याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

 

श्री.घनवट म्हणाले, हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका आहे. अशा हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरात हलाल सक्तीविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. हलाल प्रमाणपत्र केवळ मांसापुरते मर्यादित न रहाता खाद्यपदार्थ, सौदर्यप्रसाधने, औषधी, रुणालये, गृहसंस्था, मॉल यांना लागू केले जाऊ लागले आहे. व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी ४७ हजार रुपये शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र आणि त्याचा लोगो विकत घ्यावा लागत आहे. भारत शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या संस्थेकडून प्रमाणपत्र देण्याची अधिकृत व्यवस्था असतांना खाजगी मुसलमान संस्थांकडून प्रमाणपत्र का आणि कशासाठी?  असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

 

मॅकडोनाल्ड के.एफ.सी. यांसारख्या ज्या ज्या खाजगी बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के हलाल पदार्थांची विक्री होत आहे. तेही आता पूर्णपणे बंद झाले पाहिजे, या सर्व प्रकारांच्या विरोधात जिल्ह्या-जिल्ह्यांत हलाल सतीविरोधी कृती समिती स्थापन करून जनता आणि व्यापारी यांच्यामध्ये जागृती आहे. या उपक्रमात राष्ट्रप्रेमी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. घनवट यांनी केले.
हलाल जिहाद विषयी स्थानिक स्तरावर जागृती होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, यासाठी अधिवक्ता, व्यापारी आणि सामान्य हिंदु ग्राहकांपर्यन्त जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे केतन रघुवंशी यंानी सांगितले. आज समाजातील अनेकाना हलाल प्रमाणपत्राविषयी माहिती नाही आणि त्यासाठी व्यापक मोहीम राबवणे आवश्यक आहे हे लक्षात घेवून आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 

 

 

हिंदू राष्ट्र संकल्प अभियानात हिंदू राष्ट्राची आवश्यकता, हिंदू धर्माची महानता, शौर्य जागरणाची आवश्यकता, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी विषयांवरील व्याख्याने हिंदू राष्ट्रजागृती करणारी फलक प्रसिद्धी करणे, मंदिराची आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम आणि महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आले. याशिवाय हिंदू राष्ट्र संघटन मेळावे, वर्धापनदिन सोहळे, हिंदू राष्ट्र परिसंवाद आणि अधिवक्ता बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जात आहेत. या उपक्रमांतून हिंदू समाजमनात हिंदू राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदू समाजाने हिंदू राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन श्री. घनवट यांनी केले.

 

 

 

 

कु.रागेश्री देशपांडे म्हणाल्या, की २००२ मध्ये रत्नागिरीत एका धर्मद्रोही देवाची टिंगल  कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्या विरोधात उत्स्फूर्तपणे झालेले हिंदू संघटन आज २० वाढत चालले आहे. गेली २० वर्षे सातत्याने केलेल्या जातीमुळे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी राज्यात नव्हे, भारतभरात हिंदू कृतीशील झालेला दिसत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदुसंघटन, राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण या पंचसूत्रीच्या आधारे समितीकडून वर्षभर विविध उपक्रम देशभर राबवले जातात. हे सर्व कार्य ईश्वरी कृपा, संतांचे आशीर्वाद आणि हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील  होत आहे, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे, गोरक्षक केतन रघुवंशी, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक डॉ. सतीश बागुल उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

Next Post
सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add