म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील भोरटेक येथे श्री. पिंपळेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आचार्य ज्योतिषाचार्य वेदमूर्ती श्री. भूषण थेटे गुरुजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा संपन्न होणार आहे.
भोरटेक येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात चार दिवशीय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातन मूर्तीची प्रतिष्ठापना करून तीन दिवशीय मंत्रोच्चार व यज्ञ आहुती कार्यक्रम दि. १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर पर्यंत असेल. दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ मूर्ती व कलश शोभा यात्रा, दुपारी २ ते ६ प्रायश्चित संकल्प, गणपतीपुण्याह वाचन, पंचांग कर्म, मूर्ती जलाधिवास व आरती, रात्री ८ वाजता सुंदरकांड कार्यक्रम, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १२ प्रातपूजन, अग्निस्थापन, मंडल स्थापन, धान्यधिवास, दुपारी २ ते ६ प्रसादवास्तू, मुर्ती कलश स्थापन विधी, हवन कर्म, शच्याधिवास व दि. १६ डिसेंबर रोजी प्रातपूजन, प्रतिमा प्राणप्रतिष्ठा,
कलशरोहण, ध्वजरोहण, प्रधान हवन, प्रतिष्ठा होम, प्राणप्रतिष्ठा पूर्णाहूती, महाआरती व रात्री ८.३० वाजता ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री (टेंभेकर) यांची जाहीर दणदणीत कीर्तन सेवा व दि.१७ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.








