म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल सुरू आहे. श्री. एकमुखी दत्त मंदीर प्रसिद्ध आहे. श्री.दत्त प्रभुचरणी यात्रेकरुंना व भाविकांना पिण्याचे पाणी करीता महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना संस्थापक अध्यक्ष आ. श्री. ओमप्रकाश बच्चू कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब जनतेला थंड पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता होती. या गरजेला लक्षात घेऊन नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटना शहादा संघटनेतर्फे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल प्रेरणेने पाणपोई केंद्र चे उद्घाटन सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांच्या हस्ते पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच न्हानभाऊ तिरसिंग भील, श्री.दत्त मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अंबालाल पाटील, श्री.दत्त मंदीर ट्रस्टचे सचिव भिकन पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, सारंगखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव, प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, उपाध्यक्ष सुनिल चित्ते, सहकोषाध्यक्ष विठ्ठल कुरे ,सहसचिव महेंद्र मोहीते आदी उपस्थित होते.
बाटली बंद पाण्याची विक्री होऊ लागली तेव्हा पासून पाणपोई संख्या कमी झाली असली तरी गोरगरीब जनतेला पाणपोईच मोठा आधार ठरत आहे. असे मत सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांनी व्यक्त केले आहे. प्रहार शिक्षक संघटना शहादा तालुका उपाध्यक्ष सुनिल चित्ते यांनी राबविण्यात आलेल्या पाणपोई नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हा अध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी कौतुक केले आहे.








