नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे मार्गशीर्ष वद्य पंचमी दि. १३ डिसेंबर २०२२ पासून श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहास येथील विठ्ठल मंदिरात सुरुवात होत आहे.
उमर्दे खुर्द तालुका नंदुरबार येथे सप्ताहाची १०४ वर्षाची परंपरा आहे. येथील महादू चिमन पेटकर, सुपडू शेठ शिंपी, काळू शिवबा बेंद्रे यांच्या सहकाऱ्यांनी व भजनी मंडळांनी गावातील चावडीवर सप्ताहाची सुरुवात केली. चावडीवर पाच ते सात वर्ष सप्ताह झाला त्यानंतर श्री.हनुमान मंदिरावर आतापर्यंत तिसरी पिढी सप्ताहाचे आयोजन करत आहे .दोन वर्षापूर्वी विठ्ठल रुक्माई मंदिर बांधण्यात आल्याने या वर्षापासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व किर्तनी सप्ताह श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सप्ताहास सुरुवात होत आहे.
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथील श्री विठ्ठल मंदिरात १३ डिसेंबर ते २० डिसेंबर पर्यंत श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
१३ डिसेंबर २२ वार शुक्रवार रोजी ह.भ.प. जयेश मराठे महाराज यांचे कीर्तन, १४-१२-२२ ला ह भ प सतीलाल महाराज म्हसदिकर ,१५-१२२२ ला ह. भ. प. किशोर शोनखेडीकर महाराज, १६-१२-२२ रोजी ह. भ. प. अतुल नारगेकर ,१७-१२-२२ रोजी सुदर्शन महाराज वाडीभोकरकर, १८-१२-२२ रोजी ह. भ. प. श्याम सुंदर महाराज सैंदाणे कर, १९-१२-२२ आनंदराव महाराज बोरकुंडकर व २०-१२-२२ रोजी काल्याचे किर्तनआनंदराव महाराज बोरकुंड यांचे होणार असून महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकड आरती, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी नऊ ते अकरा व दुपारी तीन ते पाच , हरिपाठ सहा ते सात रात्री नऊ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्ञानेश्वरी पारायण ह. भ. प. महारू महाराज सळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ डिसेंबर २२पासून होणार असून मृदुंग आचार्य म्हणून ह भ प बाळा महाराज कंकराळेकर, गायनाचार्य म्हणून गवर लाल महाराज खडलायकर व साहेबराव महाराज हाट्टीकर, हार्मोनियम ह. भ. प. रमेश कुटे उमर्दे,ह. भ.प. दत्तू पेटकर उमर्दे , भागवताचार्य महाराज मुळे उमर्दे खुर्द हे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन कीर्तनासाठी सेवा देणार आहे.
दहिंदुले काकर्दे विखरण, कलमाडी, विखरण , सिंद गव्हाण, वडवद, भालेर, चौपाळे, रजाळे, निंभेल, कढरे, मोहिदा (क सं) ,रांजणी, असाने आदी. गावातील भजनी मंडळ कीर्तनात सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट ह.भ.प.भजनी मंडळ, ह.भ. प.ज्ञानदेव भजनी मंडळ, ह. भ.प. शिवानंद भजनी मंडळ, भातोजी महाराज भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, हरे राम हरे कृष्ण मित्र मंडळ (प्रभात फेरी )अन्नपूर्णा भवानी माता निळकंठेश्वर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थांतर्फे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तने सप्ताहाचे करण्यात आले आहे.








