Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंतरराज्य गुन्हे उघडकीस :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकी जप्त करीत दोघांना केली अटक

team by team
December 8, 2022
in क्राईम
0
आंतरराज्य गुन्हे उघडकीस :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकी जप्त करीत दोघांना केली अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

 

मोटार सायकल चोरी करणारे 2 संशयित यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपये किमंतीच्या 7 दुचाकी जप्त केल्या आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत. त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते.

 

 

त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

 

 

 

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.

 

 

३ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरात नवापूर चौफुली परीसरात दोन इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची ” माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक करुन त्यांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परीसरात जावून खात्री केली असता एका पान टपरी जवळ दोन इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना दोन्ही संशयीत इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन निलेश हसीराम कोकणी रा. झामट्यावड ता. नवापूर, राकेश दिलवर कोकणी वय-21 रा. बिजादेवी ता. नवापूर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटर सायकल बाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.

 

 

 

 

म्हणुन त्यास स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय नंदुरबार येथे आणुन विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, त्यांनी सदरची मोटार सायकल सुमारे 20 ते 25 दिवसापूर्वी नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालय परिसर येथून रात्रीच्यावेळी दोघांनी मिळून चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटार सायकलबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

 

 

 

 

ताब्यात घेण्यात आलेला राकेश दिलवर कोकणी रा. बिजादेवी ता. नवापूर याच्याविरुद्ध यापूर्वी देखील मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले. म्हणून त्यास अधीक विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील एका गावातून चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेली मोटार सायकल कोठे आहेत ? याबाबत विचारले असता त्याच्या शेतात एक मोटार सायकल ठेवलेली आहे. तसेच निलेश कोकणी यास विचारपूस केली असता त्याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा वालोद व सुरत जिल्हा येथून चोरी केल्याचे सांगून चोरी केलेल्या पाच मोटार सायकल त्याने त्याच्या घराच्या मागील बाजूस ठेवलेल्या आहेत बाबत सविस्तर माहिती दिल्याने 2 लाख 65 हजार रुपये किमतीच्या एकुण 7 मोटार सायकली कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

 

 

तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस करण्यात आलेले आहेत व आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या अजून एकास स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या, आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात

Next Post

अरे व्वा : आता सारंगखेडा यात्रेत अन्न विक्रेते व पदार्थांची होणार तपासणी

Next Post
अरे व्वा : आता सारंगखेडा यात्रेत अन्न विक्रेते व पदार्थांची होणार तपासणी

अरे व्वा : आता सारंगखेडा यात्रेत अन्न विक्रेते व पदार्थांची होणार तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add