Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या अजून एकास स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या, आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात

Mahesh Patil by Mahesh Patil
December 8, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेलच्या खिडकी तोडुन फरार, एकास पकडले

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 1 गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यातून अटक केली असून लवकरच इतर आरोपींचा शोध घेण्यात येईल असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, 5 डिसेंबर रोजी रात्री नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण रा- कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद,इरफान इब्राहिम पठाण, युसुफ असिफ पठाण, गौसखों हानिफखॉ पठाण रा- ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद, अकिलखों ईस्माईलखॉ पठाण रा. कठोरा बाजार ता- भोकरदन जि. जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाडी ( MH 13 N 7626) वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 6.45 वा. अटक करण्यात आली होती.

 

 

 

परंतु 5 डिसेंबर रोजी 9.05 वा. सुमारास वर नमुद पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या दोन तासापूर्वी अटक केलेल्या दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या आरोपीतांनी लॉकअपची खिडकी फोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.

 

 

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी फरार आरोपीतांचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे 6 वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांचे मुळ गाव असलेले औरंगाबाद, जालना जिल्ह्यात, गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना करुन केले.आरोपीतांचा नवापूर तालुक्यात व नवापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात सर्वत्र शोध मोहिम राबवून नवापूर तालुक्यातील सर्व परिसत पिंजून काढला.

 

 

 

लॉकअप तोडून पळालेला आरोपी नामे हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण रा. कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने पकडण्यात यश आले. परंतु फरार असलेले चार आरोपीतांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

 

 

 

८ डिसेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीतांपैकी एक आरोपी अकीखाँ पठाण हा मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यात खडकावाणी गावात त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सदर माहिती कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ फरार आरोपीतास ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गाव गाठून सुरुवातीला त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेतात राहात असल्याची माहिती काढली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या नातेवाईकाचे खडकावाणी गावाच्या बाहेर जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला. परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून एक इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

 

 

 

ताब्यात घेतलेल्या इसमाला नाव गाव विचारले असता अकीलखों ईसमाईलखाँ पठाण रा. कठोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना असे सांगितल्याने पथकाची खात्री झाली. म्हणून त्यास ताब्यात घेवून नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेले उर्वरीत तीन आरोपीतांना देखील लवकरच बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, रामदास माळी यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

Next Post

आंतरराज्य गुन्हे उघडकीस :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकी जप्त करीत दोघांना केली अटक

Next Post
आंतरराज्य गुन्हे उघडकीस :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकी जप्त करीत दोघांना केली अटक

आंतरराज्य गुन्हे उघडकीस :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात दुचाकी जप्त करीत दोघांना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,745 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group