Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

team by team
December 8, 2022
in राष्ट्रीय
0
ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

नंदुरबार l प्रतिनिधी

दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबर, 2022 रोजी होणार असल्याची माहिती माहिती संजय गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिनासापासून सर्व राज्ये आजी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ मंगळवार 13 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 12-00 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनपर सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातीली माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांनी तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्व शासकीय, निम शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन

Next Post

नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या अजून एकास स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या, आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात

Next Post
अरे बापरे : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेलच्या खिडकी तोडुन फरार, एकास पकडले

नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या अजून एकास स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या, आतापर्यंत दोन आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add