Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार तालुक्यातील सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे नऊ अर्ज अवैध

team by team
December 5, 2022
in राजकीय
0
नंदूरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी एकुन ९६ तर सदस्य पदासाठी ४७२ अर्ज दाखल
नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज तहसिल कार्यालयात झालेल्या अर्ज छाननीत सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे ९ अर्ज अवैध ठरल्याने आता सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 466 अर्ज दाखल वैध ठरले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर असुन त्याच दिवशी चित्र स्पस्ट होणार आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रूक, रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, कानळदे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली १८ या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकुन 94 तर सदस्य पदासाठी 475 अर्ज दाखल करण्यात आले होते.आज तहसिल कार्यालयात झालेल्या अर्ज छाननीत सरपंच पदासाठीचा 1 तर सदस्यपदाचे ९ अर्ज अवैध ठरल्याने आता सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 466 अर्ज वैध ठरले.
आज झालेल्या अर्ज छाननीत सरपंचासदासाठी तलवाडे बु.येथील निर्मला आनंदा पाटील यांचा अर्ज जात वैधतेमुळे अवैध ठरवण्यात आला.तर सदस्यपदासाठी तिसी येथील मिराबाई भिल वैधता प्रमाणपत्र नाही, धानोरा आरती वसावे शैक्षणीक पात्रता,अजिंक्य वसावे वय कमी, ओसर्ली येथील सुनिल भिल, आक्का गावीत यांचे दोन अर्ज, कोकीळाबाई कोळी यांचे अर्ज जात वैधतेमुळे अवैध ठरवण्यात आला.तर सवाबाई भिल जात वैधता प्रमाणपत्र, रजाळे येथील विद्याबाई पानपाटील जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने नामांकन अवैध ठरवण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर असुन त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पस्ट होणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, पाच पोलीस कर्मचारी जखमी, एक दुचाकी स्वार, दोघांची प्रकृती गंभीर

Next Post

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

Next Post
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add