Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, पाच पोलीस कर्मचारी जखमी, एक दुचाकी स्वार, दोघांची प्रकृती गंभीर

team by team
December 5, 2022
in क्राईम
0
पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, पाच पोलीस कर्मचारी जखमी, एक दुचाकी स्वार, दोघांची प्रकृती गंभीर

नंदूरबार l प्रतिनिधी

मनरद ता. शहादा गावाजवळील पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात फॉरेन्सिक लॅब या विभागाची पोलीस व्हॅन पलटल्याने चालकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून दुचाकीवरील ७२ वर्षीय वृध्द ठार झाल्याची घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे काल दि.3 नोव्हेंबर रोजी रात्री चार ठिकाणी घरफोडी झाल्याने तेथील ठसे व महत्वाची माहिती संकलित करण्यासाठी आज नंदूरबार येथील फॉरेन्सिक लॅब चे पथक दाखल झाले होते.दरम्यान ५ डिसेंबर रोजी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लोणखेडा माहिती संकलित करून पुन्हा नंदुरबार येथे जात असलेल्या फॉरेन्सिक लॅब या पोलीस विभागाच्या पोलीस व्हॅनचा मनरद ता.शहादा गावाजवळील नायरा पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल (क्र.एम.एच.१८ ए.एफ. ५७००) ला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस व्हॅन पलटून रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली.

 

त्यात होंडा एक्टिवा चालविणारे शंकर त्र्यंबक पाटील (७२) रा. मनरद, ता. शहादा हे जागीच ठार झाले. तर या अपघातात पोलीस व्हॅन चालक साबीर फिरोज पिंजारी , प्रकाश नथू भाबड , संजय रतन रामोळे , दिनेश गोपाल लाडकर , गोकुळ भरत गावित, दिलीप संतोष गावित हे जखमी झाले आहेत. त्यात साबीर पिंजारी व प्रकाश नथू भाबड यांना जबर दुखापत झाल्याने दोघांची प्रकृती गंभीर आहे.

 

 

या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातमी शेअर करा
Previous Post

असावे कुणीतरी, मयुर पंख कविता संग्रहाचे प्रकाशन

Next Post

नंदूरबार तालुक्यातील सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे नऊ अर्ज अवैध

Next Post
नंदूरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सरपंच पदासाठी एकुन ९६ तर सदस्य पदासाठी ४७२ अर्ज दाखल

नंदूरबार तालुक्यातील सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे नऊ अर्ज अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add