म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील कै. दादासाहेब बी. एस. भामरे विद्यालयात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व आरोग्य शिक्षण विभाग मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संबधित विभागाचे, तालुका हिवताप पर्यवेक्षक सुनील मराठे , आरोग्य सेवक , दिनेश राजपूत, दीपक भामरे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी. यु. ठाकरे,आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, प्रास्ताविक डी. ए. पाटील यांनी केले डी.आर. पाटील यांनी आभार मानले.