नंदूरबार l प्रतिनिधी
जैन आचार्य श्री जिनकान्तिसागरसूरीश्वरजी म.सा. यांची 37 वी पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
जैन आचार्य प्रज्ञापुरुष श्री जिनकान्तिसागरसूरीश्वरजी म.सा. यांची 37 वी पुण्यतिथि निमित्ताने अक्कलकुवा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प.पू.खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी म.सा. यांचे शिष्य प.पू. मुनि श्री समयप्रभसागरजी म.सा., प.पू. मुनि श्री. श्रेयांसप्रभसागरजी म.सा., एवं प.पू. मुनि श्री. महितप्रभसागरजी म.सा. आदि ठाणा 3 यांचा पावन निश्रेत व प.पू.साध्वी श्री. प्रियस्नेहांजनाश्रीजी म.सा. आदि ठाणा 4 यांचा उपस्थित सकाळी 9 वाजता गुणानुवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची शुरुवात प.पू. मुनि श्री समयप्रभसागरजी म.सा. यांचा द्वारे मंगलाचरण ने करण्यात आले. यावेळी प.पू.साध्वी मंडल तर्फे गीत गायन करण्यात आले. पश्च्यात प.पू. आचार्य भगवंत यांना वासक्षेप पूजन च्या लाभ कुशल राजमल गुलेच्छा यांनी घेतला पश्च्यात शुभम भंसाली यांनी आपले मनोगत व्यक्त करत प.पू.आचार्य भगवंत यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबदल माहिती देत अभिवादन केले. प.पू.साध्वी श्री प्रियस्नेहांजनाश्रीजी म.सा. यांनी आचार्य भगवंत यांचा जीवन चरित्र वर उजेळ टाकला, पश्च्यात प.पू. समयप्रभसागरजी म.सा. यांनी आचार्य भगवंतच्या विविध गुणा बदल सांगितले, तर प.पू.महितप्रभसागरजी म.सा. यांनी ही आपले अनुभव सांगत श्रद्धा सुमन अर्पित केले. यावेळी सामूहिक सामायिकच्ये ही आयोजन करण्यात आले होते.
दुपारी २:३०वाजता श्री जिनकुशलसूरि दादावाडी येथे प.पू. आचार्य भगवंत जिनकान्तिसागरसुरीश्वरजी म.सा. यांची पूजाच्ये आयोजन करण्यात आले त्याचा लाभ सौ. उषाबाई राजेंद्र डागा परिवार यांनी घेतला. यावेळी श्री वासुपूज्य पवित्र महिला मंडल तर्फे पूजा भवनात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.








