नंदुरबार l

तालुक्यातील ठाणेपाडा घाटाजवळ एस.टी.बसने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चौघांना दुखापत झाली असून याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सुरेश पुना बेडसे हे त्यांच्या चारचाकी वाहनाने (एम.एच.१५ जीएल ३३९१) नंदुरबार-नाशिक रस्त्याने जात होते. यावेळी विजय गोपीनाथ सोनवणे (रा.नामपूर ता.सटाणा) याने त्याच्या ताब्यातील एस.टी.बस (क्र.एम.एच.११ बीएल ९३२५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात एस.टी.बस चालवून ठाणेपाडा घाटाच्या खाली आष्टे गावाजवळील विटभट्टीजवळ चारचाकी वाहनाला मागून धडक दिल्याने अपघात घडला.
यात चारचाकी वाहनातील सुरेश पुना बेडसे, अरुणा सुरेश बेडसे, दिलीप धुडकू बागले व मंदाकिनी दिलीप बागले (सर्व रा.इंद्रायणी कॉलनी, चांदवड जि.नाशिक) यांना दुखापत झाली. तसेच वाहनाचेही नुकसान झाले. याबाबत सुरेश बेडसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात विजय सोनवणे याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत.









