Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे : चक्क ९६ टक्के भावी शिक्षक नापास

team by team
November 16, 2022
in राज्य
0
अरे बापरे : चक्क ९६ टक्के भावी शिक्षक नापास

नंदूरबार l प्रतिनिधी

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल यावर्षी केवळ ३.७९ टक्के लागला असून ९६ टक्के भावी शिक्षक नापास झाले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा निकाल गेल्या आठवड्यात लागला.एमपीएससी, आणि यूपीएससी,या सारख्या अवघड परीक्षांपेक्षा टीईटी परीक्षा कठीण झाल्याची प्रतिक्रिया भावी शिक्षक देत आहेत.टीईटीचा निकाल दिवसेंदिवस खूप कमी लागत आहे.यंदा परीक्षेला बसलेले ९६ टक्के परीक्षार्थी नापास झाले असून,त्यांचे यंदा ही शिक्षक बनवण्याचे स्वप्न भंगले आहे.त्यामुळे काही या परीक्षेकडे पाठ फिरवून इतर कामधंदा करून टीईटीचा नाद सोडून देणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

शिक्षक म्हणून पात्रता मिळवण्यासाठी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) निकालात केवळ पन्नास टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.इयत्ता पहीली ते पाचवी गटातील परीक्षेत केवळ ३.७९ टक्के तर इयत्ता सहावी ते आठवी गटातील परीक्षेत केवळ ३.५६ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या परीक्षेत तब्बल ९६ टक्के हून अधिक परिक्षार्थी अनूत्तीर्ण झाले आहेत.

 

 

महाराष्ट्रात शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात.कोरोनाकाळामुळे २०१९ पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेकडून झाले नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१ ला परीक्षा घेण्यात आली.मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याआधीच २०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला.त्यात गैरप्रकार केलेल्या ७,८७४ परीक्षार्थींची नावे राज्याचा परीक्षा परिषदेकडून जाहीर केली.

 

 

 

या सगळ्यां प्रकरणांमुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेची निकाल प्रक्रिया लांबली होती.अखेर परीक्षा परिषदेकडून गेल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात आला.

 

एक काळ असा होता की,बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डी.एड्.ला प्रवेश घेण्या-यांची संख्या लाखोमध्ये होती.२०१२ पासून शिक्षक भरती बंद झाल्यानंतर डी एड् कडे जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या आपोआप घटली.त्यामुळे डी एड् महाविद्यालये अर्थात शिक्षक तयार करण्याचे कारखाने एकापाठोपाठ बंद पडू लागले.संस्था चालकांवर विद्यार्थी शोधत फिरण्याची वेळ आली.जिल्हयात आजच्या घडीला बोटावर मोजता येतील इतक्याच डी एड् महाविद्यालये सुरू आहेत.

 

 

 

ते ही विद्यार्थी प्रवेश घेतात व परीक्षेलाच येतात.अशी अवस्था आहे.टिईटी सक्तीची झाल्यापासून परीक्षेची काठीण्य पातळी पाहता भ्रष्टाचार करून उत्तीर्ण होण्याकडे अनेकांचा कल असून वाढला आहे.ज्यांना परीक्षा उत्तीर्ण होणं शक्य नाही व पैसा ही देणे अशक्य आहे.अशांनी टीईटी व शिक्षक बनवण्याचा नाद सोडला असून कूठे चहा,कोणी भाजी पाला विक्री तर काही घरी शेतीत रममाण झाले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रा.राहुल संधानशिव यांना पीएचडी प्रदान

Next Post

बसची चारचाकी वाहनाला धडक ; चौघे जखमी

Next Post
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण

बसची चारचाकी वाहनाला धडक ; चौघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add