शहादा l प्रतिनिधी
जनजातीय गौरव दिनानिमित्त येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शहरातील व्हॉलंटरी हायस्कूल येथे जनताती गौरव दिनाचे औचित्य साधत आरोग्यदूत आ.राजेश पाडवी व कै.कलावती फाऊंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित शिबीराचे उद्घाटन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील,तालुका ग्रामीण कार्याध्यक्ष डॉ.किशोर पाटील,नेत्रतज्ञ डॉ.वसंत पाटील,भाजपा शहराध्यक्ष विनोद जैन,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे,महिला आघाडीच्या किन्नरी सोनार,रोहिणी भावसार,नंदा सोनवणे, भावना लोहार, वंदना भावसार,अनामिका चौधरी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबीरात विविध आजारांशी निगडीत तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचाराबद्दल मार्गदर्शन केले.
या शिबिरात बालके, महिला तसेच पुरुषांच्या विविध शारीरिक आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नाशिक येथील ग्रॅव्हिटी ग्रुपचे तज्ञ डॉ. बीपीन पटेल, डॉ.अनुज नेहेते, डॉ.आशुतोष उशीर, डॉ.मेहुल सरकार व डॉ. अमोल कोलमकर यांच्या वतीने रुग्णांची तपासणी करण्यात येवून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच एनजिओग्राफीची सुविधा देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
शिबीर यशस्वीतेसाठी कल्पेश पाटील, बालु भाई पाटील, पंकज सोनार,हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, जितेद्र शिकलीकर, कमलेश जांगिड, संदिप राजपाल,कमल पावरा, सचिन पावरा (मंदाणा )प्रमोद ठाकरे (लंगडी), प्रशात कुलकर्णी,सुभाष वाघ,सुधीर पवार, सामरसिग पावरा,रामदास पावरा,पिन्टु पाटील,अनिल ठाकरे,रुपेश पाटील,स्वीय सहाय्यक हेमराज पवार, दीपक ठाकरे,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








