Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

team by team
November 11, 2022
in राष्ट्रीय
0
अरे व्वा : या कारणासाठी नंदूरबार देशातील ठरला पहिला जिल्हा

नंदुरबार l प्रतिनिधी

 

ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील उत्पादकांना आणण्यासाठी कौशल्य विकास विभाग व प्रोटीन टेक्नोलॉजीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करणारा नंदुरबार हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यातील स्थानिक बचतगट, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यामार्फत तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू व मालाची विक्री केंद्र शासनाच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि प्रोटीन टेक्नोलॉजी, मुंबई यांच्या समवेत आज सामंजस्य करार करण्यात आला.

 

 

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावड़े, सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, मंदार पत्की, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे व्हाईस प्रेसिडेंट अंकुश देशपांडे, रॉबिन पांडे आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी ओएनडीसीचे प्रोटीन टेक्नॉलॉजीचे अंकुश देशपांडे आणि रॉबिन पांडे यांनी ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आणि या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या “नंदुरबार ई-मार्केट प्लेस” च्या वापरा संदर्भात सादरीकरण केले. पहिल्या फेरीत 5 विक्रेत्यांची नोंदणी या प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे करण्यात आली. आगामी काळात प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 300 उत्पादकांची नोंदणी प्रोटीन टेक्नॉलॉजीमार्फत नंदुरबार ई-स्टोरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने नाबार्ड, माविम, उमेद, कृषी विज्ञान केंद्र, विविध स्वयंसेवी संस्थासोबत जुळलेल्या व वैयक्तिक नाविन्यपूर्ण उत्पादन बनविणाऱ्या उत्पादकांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

 

जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या की, नंदुरबार जिल्हा हा ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्म वर समर्पित ई-स्टोर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. बदलत्या काळात डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे महत्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील उत्पादकांनी विशेषत: बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ओएनडीसी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या “नंदुरबार ई-मार्केट प्लेस” च्या वापरावर जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन आपल्या उत्पादनाची विक्री करुन आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी. यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगानी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी

Next Post
जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी

जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत 9 डिसेंबरला सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add