बोरद | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड येथे भर वस्तीत धाडसी घरपोडी झाली असुन ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,मोड ता.तळोदा येथील उखा नारायण चौधरी यांचे भर वस्तीत घर आहे.आजूबाजूला सर्वच भाऊबंदकी असून सुद्धा चोरांनी मोठ्या धाडसाने घरफोडी केली. ९ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करीत कपाट तोडून त्यातील ६० हजार रूपये रोख व ११ हजाराचा ३२ इंची टीव्ही असा ७१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घड या उखा चौधरी हे अंकलेश्वर येथे गेले होते.
त्यांची दोन घर आहेत त्यात मेन घरामध्ये समोर त्यांच्या मुलगा आणि त्यांची सुनबाई होत्या.परंतु चोरी करताना चोरांनी जवळच्या सर्व घरांच्या कड्या लावून ठेवल्या होत्या.सकाळी घरातील महिलांचा लक्षात हा प्रकार आला.याबाबत तळोदा पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांना तसेच बोरद येथील हवालदार गौतम बोराडे यांना सांगण्यात आले.तातडीने या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार बागुल व पोलीस राजू जगताप,हवालदार गौतम बोराडे ज्यांनी प्रत्येक येऊन भेट दिली.भरवस्तीत झालेल्या घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या ठिकाणी सकाळी दहा वाजता डीवायएसपी अक्कलकुवा संभाजी सावंत यांनी भेट देऊन पहाणी केली त्यांनी लगेच नंदुरबारला संपर्क साधून तेथील पोलीस खात्याचे ठसे तज्ञ पोलीस उपनिरीक्षक प्रकाश धामणे तसेच श्वान पथकाला पाचारण केले.याप्रकरणी दिलीप शंकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








