Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

team by team
November 10, 2022
in राज्य
0
कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

नंदुरबार | प्रतिनिधी

 

तंबाखुचे व्यसन सोडण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करण्याबरोबर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा २००३ (कोटपा)ची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व सबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज जिल्हास्तरीय कार्यशाळेत दिल्यात.

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्यावतीने राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातर्ंगत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमितकुमार पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल, दंत शल्यचिकित्सक तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे, राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख आदी उपस्थित होते.

 

 

 

 

जिल्हाधिकारी श्रीमती. खत्री म्हणाल्या की, देशात तंबाखु सेवन ही गंभीर समस्या आहे. तंबाखु सेवनामुळे कॅन्सर सारख्या आजाराबरोबरच आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. त्यामुळे तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन रोखण्यासाठी शासकीय यंत्रणासोबतच नागरीकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. याकरीता कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा, महाविद्यालय तसेच उच्च शिक्षणसंस्था परिसरात १०० यार्ड  परिघातात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री  करण्यास कायद्याने बंदी असून या कायद्याचे उल्लंघन केल्यास  संबंधितावर कडक कारवाई करावी. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखुच्या दुष्परिणाम जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात यावेत.

 

 

 

 

प्रसार माध्यमांनी समाजात  तंबाखुच्या वापरामुळे होणार्‍या घातक दुष्परिणाम विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच नागरीकांनी रेल्वे, बसस्थांनक,सार्वजनिक ठिकाणे, शासकीय, निमशासकीय, रुग्णालय परिसरात तंबाखुजन्य पदार्थाचा वापर करु नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

 

दंत शल्यचिकित्सक तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील तंबाखूमुळे होणार्‍या कर्करोगग्रस्त रुग्णाची प्राथमिक तपासणी, निदान, उपचार हे जिल्हा रुग्णालयातील दंत रुग्णालयात करण्यात येत असून जे गंभीर स्वरुपांचे कर्करोगग्रस्त रुग्ण आहे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे संदर्भित केले जात असल्याचे सांगितले. तसेच कोटपा कायद्याचे अधिकार, कायद्यातील नवीन तरतुदी संदर्भात शासकीय व निमशासकीय अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्षेत्रातील जिल्हयामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या होणारी तंबाखुची जाहिरात, प्रोत्साहन, सहयोगाची घटनेबाबत मार्गदर्शन करुन जिल्हा तंबाखुमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

 

मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख यांनी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातर्ंगत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजनामागील भूमिका तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा २००३ (कोटपा) अतर्ंगत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, तंबाखुजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहीरातींवर बंदी, १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास बंदी, शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी, सर्व तंबाखूजन्य पदार्थांच्या वेस्टनावर निर्देशित धोक्याची सुचना देणे, या कायदान्वये दंड वसुल व अंमलबजावणी करणारे अधिकृत अधिकारी यांच्याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

 

 

 

सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा २००३ (कोटपा) कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असून वैयक्तिक गुन्हा केल्यास २०० रुपये पर्यंत प्रत्यक्ष जागेवर दंड करणे तर कलम पाच नुसार तंबाखुजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी असून पहिला गुन्हा असेल तर २ वर्ष शिक्षा किंवा १ हजार पर्यंत दंड . कलम ६ अ नुसार १८ वर्षांखालील व्यक्तिंना तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास बंदी असून २०० रुपये प्रत्यक्ष जागेवर दंड तर कलम ६ ब नुसार शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास २०० रुपये प्रत्यक्ष जागेवर दंड असेल. तसेच सर्व तंबाखुजन्य पदार्थाच्या वेस्टनावर निर्देशित धोक्याची सूचना देणे आवश्यक असून

 

 

 

असे टाळल्यास उत्पादकाचा पहिला जामीनपात्र गुन्हा असून २ वर्षांपर्यत शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दुसरा गुन्हा असेल तर ५ वर्षापर्यंत शिक्षा किंवा १० हजार दंड, विक्रेत्यांचा पहिला गुन्हा असेल तर १ वर्षांपर्यत शिक्षा किंवा १ हजार रुपयापर्यंत दंड तर दुसरा गुन्हा असेल तर २ वर्षांपर्यत शिक्षा किंवा ३ हजार रुपये दंडांची तरतूद कोटपामध्ये करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्ंगत तंबाखूचे सेवन सोडविण्यासाठी व सहाय्याकरीता १८००११२३५६/  १८००११०४५६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क  साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले. कार्यशाळेस विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ओळखीचाच निघाला चोर : बालाजी वेफर्सच्या वाहनावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

मोड येथे भरवस्तीत धाडसी घरपोड, ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post
मोड येथे भरवस्तीत धाडसी घरपोड, ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

मोड येथे भरवस्तीत धाडसी घरपोड, ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add