नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील बह्याणे येथून व शहादा येथील कल्याणी अपार्टमेंट येथून अशा दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील बह्याणे येथील विजयसिंग शामसिंग राजपूत यांच्या मालकीची दुचाकी बाह्याने गावाजवळ असलेल्या शेताच्या बांधाजवळून चोरट्याने लंपास केली. तसेच शहादा येथील दिलीप रामदास चव्हाण यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएफ ७००३) कल्याणी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरट्याने लंपास केली. याबाबत शहादा व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.