नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील ओरपाडा नोयराफळीपाडा व सल्लीबार येथील दोघा विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील ओरपाडा नोयराफळीपाडा येथील रेखा यांचा विवाह बाला वनकर वसावे याच्याशी झाला होता. मात्र विवाहानंतर बाला वनकर वसावे, वनकर जेरमा वसावे, समकाबाई वनकर वसावे व मालतीबाई बाला वसावे सर्व रा.मोख खुर्द ता.धडगाव) यांनी विवाहितेचा छळ केला. तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार येथील ललीताबाई दामू वसावे या विवाहितेचा पती दामू रामजी वसावे, सासू खारकीबाई दामू वसावे, नटवर रामजी वसावे सर्व मोख ता.धडगाव, सोनी पारता वळवी रा.वेहगी ता.अक्कलकुवा व सागरा वन्या वळवी रा.बेडाकुंड ता.अक्कलकुवा यांनी विवाहितेचा छळ करीत शिवीगाळ व हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत मोलगी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक बुनकर करीत आहेत.