नंदुरबार l प्रतिनिधी-
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते,खा.संजय राऊत यांची अखेर जामीनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला रनाळा ता.नंदुरबार येथे फटाक्यांची आतिशबाजी करीत जल्लोषोत्सव साजरा करण्यात आला.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थ नगर) पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप होता. खासदार संजय राऊत यांच्या जमीनाच्या मार्ग मोकळ्या झाल्यानंतर नंदुरबार तालुक्यातील रनाळा येथे शिवसेनेचे (उबाठा)माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख दीपक गवते यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी संतोष पाटील, योगेश सानप, बबलू नागरे,गणेश शिंत्रे, योगेश सानप, शरद पाटील,साहेब घुगे,राजू पठाण,लखन भील,विक्की चौधरी,पंकज नागरे आदी उपस्थित होते.








