Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोबाईल ॲप पाहून घेतले मोटरसायकल चोरीचे प्रशिक्षण, विसरवाडी पोलीसांकडून एकास अटक, सहा मोटरसायकली हस्तगत

team by team
November 8, 2022
in क्राईम
0
मोबाईल ॲप पाहून घेतले मोटरसायकल चोरीचे प्रशिक्षण, विसरवाडी पोलीसांकडून एकास अटक, सहा मोटरसायकली हस्तगत
नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथे मोटरसायकल चोरी करणार्‍या चोरटयास अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील ‘टिकीया’ ऍप पाहून याने चोरीचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथे गेल्या पाच, सहा महिन्यांपासून रात्रीच्या वेळी एकसारख्या मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.भोजराज धनगर, अनिल राठोड, लिनेश पाडवी, चालक राजू कोकणी, विशाल गावीत, होमगार्ड प्रकाश गावीत यांनी विसरवाडी व खांडबारा येथील चोरांविषयी माहिती काढण्यास सुरुवात केली.
त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर आरोपी बाळा छोटीराम गायकवाड (वय २१ रा.वरपाडा पोस्ट पिंपळगाव ता.साक्री) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने विसरवाडी, खांडबारा, धुळे जिल्ह्यातील छडवेल, नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद, जायखेडा येथून एकुण सहा मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याकडुन एकुण सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर आरोपीने सोशल मीडियावर असलेले ‘टिकीया’ ऍप पाहुन मोटरसायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली. मोटारसायकल चोराला अटक करुन मुद्देमाल जप्त केल्यामुळे विसरवाडी पोलीसांचे अभिनंदन करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

कार्तिकी स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Next Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबारला नोटबंदीला श्रद्धांजली

Next Post
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबारला नोटबंदीला श्रद्धांजली

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबारला नोटबंदीला श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add