Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भिडे गुरुजींना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना पदावरून हटवा

team by team
November 5, 2022
in राज्य
0
भिडे गुरुजींना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना पदावरून हटवा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

भिडे गुरुजींनी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून हेतूतः त्यांना लक्ष्य केले जात आहे. महिलांना भारतमातेसमान मानणार्‍या भिडेगुरुजींनी वडिलकीच्या नात्याने केलेल्या सूचनेचा भावार्थ समजून न घेता त्यांना महिलाविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे विधवा महिलांना कुंकू लावण्याची मोहिम घेतली की ते पुरोगामित्व. तेच पुरोगामित्व एक विवाहित स्त्रीला कुंकू लावण्यास सांगितल्यावर धोक्यात कसे काय येते ? विधवा महिलेला कुंकू लावणे योग्य असेल, तर विवाहित महिलेला कुंकू लाव असे म्हणणे, हा गुन्हा कसा होऊ शकतो ? हा विषय महिला आयोगाच्या कक्षेत येतो का? महिला आयोगाचे अध्यक्षपद निपक्ष असले पाहिजे;

 

 

पण आपल्या पदाचा राजकीय हेतूने उपयोग करून स्वपक्षातील प्रकरणांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर करणार्‍या करणार्‍या सौ. चाकणकर यांना पदावर रहाण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे सरकारने त्यांना तात्काळ या पदावरून हटवून निपक्ष व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवावे, अशी आमची मागणी आहे.

 

 

नवी मुंबईत नुकतेच चर्चप्रणीत अनाथालयात अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले, यावर महिला आयोगाने कठोर भूमिका का घेतली नाही ? धनंजय मुंडे यांच्यावर महिलांनी आरोप केल्यावर त्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न का झाला नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या भाषणात ‘मम भार्या समर्पयामी’ म्हणत समस्त महिलांचा जाहीर अपमान केला, त्यांना आयोगाने नोटीस का बजावली नाही? दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या संदर्भात ‘तिच्यापेक्षा माझी छाती मोठी आहे’ असे अतिशय अश्लाघ्य विधान केले होते,

 

 

त्यांना देखील नोटीस पाठवण्याचे धाडस आमच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना झाले नाही; मात्र हिंदु संस्कृतीचे स्मरण करून देणारे विधान हे त्यांना जास्त घातक वाटते. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो. हिंदुत्वनिष्ठ सरकार सत्तेवर असतांना अशा हिंदुद्वेषी नेत्यांना महत्त्वाच्या पदावर अद्यापपर्यंत का ठेवण्यात आले आहे, असा आमचा प्रश्न आहे.

 

 

मुळात यापूर्वी भिडे गुरुजींना भीमा-कोरेगांव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न असफल झाल्यामुळे येनकेन प्रकारे भिडे गुरुजींना त्रास देण्याचा हा प्रयत्न चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भिडे गुरुजींना पाठवलेली नोटीस हा त्यातलाच प्रकार आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते.

 

 

ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांच्या विचारांचा प्रसार केला, हिंदु संस्कृतीनुसार आचरण केले, महिलांचा सन्मान करण्याची शिकवण युवकांना दिली, अशा ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर शिंतोंडे उडवणार्‍या रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुव्यात दुकान फोडून रोकड लांबविली

Next Post

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी

Next Post
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add