नंदुरबार | प्रतिनिधी
येथील सैय्यद फरहत हुसैन यांची एम.आई.एम जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असुन तीन तालुक्याची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे एकच जल्लोष करण्यात आला.
सुमारे सव्वा वर्ष अगोदर नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आलेल्या अनपेक्षित बदला नंतर सुरु झालेलं पक्षांतर्गत कलहाला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खा.सैय्यद इम्तियाज जलील यांनी अखेर विराम लावला असुन राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका बघता खा.जलील यांनी औरंगाबाद येथील नासिर सिद्दीकी, महाराष्ट्र पार्लिमेंटरी बोर्ड सदस्य प्रभाकर पारधे व औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शेख अहमद अश्या त्रीसदस्य समिती बनवून नंदुरबारला पाठवली असता,
संपूर्ण दिवस ते नंदुरबारला थांबुन पक्षाचे सर्व आजी,माजी पदाधिकारी व कार्यकत्यांना भेटुन अहवाल तयार करीत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केला, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष यांनी सैय्यद फरहत हुसैन यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्त केली,तसेच जिशान पठान यांना शहादा, तळोदा व अक्राणी तालुका तर सैय्यद फरहत हुसैन यांना नंदुरबार, नवापूर व अक्कलकुआ या तीन तालुक्याची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आल्याचे निर्देश दिले.
सदर नियुक्ती वजा आदेशाची प्रत नंदुरबार जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक शेख अहमद यांनी व्हॉट्सअप व ट्विट करून दिली. सैय्यद फरहत हुसैन यांची नियुक्तीची बातमी जिल्ह्यात पसरताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरत जल्लोष साजरे करीत संपर्क कार्यालयात जाऊन सत्कार केला.ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एम.आई.एम पक्षात झालेले बदल स्थानिक राजकारणात कोणाचे गणीत बसवेल किंवा बिघडवेल हे पाहणे महत्वाचे राहील.








