नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव येथे दि.4 नोव्हेंबर रोजी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाजपच्या मेळाव्याचे आयोजन तसेच खासदार डॉ.हिना गावित यांच्याहस्ते उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना गॅस वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शहरातील होळी चौक परिसरात दिनांक 4 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षातर्फे नागरिक सत्कार पक्षप्रवेश व उज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धडगाव शहरातील होळी चौक परिसरात या कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले असून त्यानंतर धडगाव तालुक्यातीलच कात्री घोडा पाडा या गावात भारतीय जनता पक्षाचा मेळावा ठेवण्यात आला असून याप्रसंगी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके यांनी दिले असून या कार्यक्रमाचे आयोजन भरत झाल्या पावरा यांनी केला असल्याचे असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवाजी पराडके यांनी केले आहे.