नवापूर l
नवापूर शहरात श्री.रामभक्त स्व.कोठारी बंधु यांचे स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड आयोजित भव्य रक्तदान शिबिर शहरातील लिंमडावाडी भागातील अग्रवाल भवन येथे आयोजित करण्यात आले होते.यावेळी १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम भगवान,देवमोगरा माता, अग्रसेन महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत,भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,मठ मंदीर प्रमुख देवगिरी प्रांत कैलास गायकवाड,सहमंत्री विहिप देवगिरी प्रात ललीत चौधरी,नगराध्यक्षा हेमलता पाटील,तहसिलदार मंदार कुलकर्णी,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उद्योजक रमेश अग्रवाल,नगरसेवक महेंद्र दुसाने,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,अग्रवाल समाज अध्यक्ष जयंतीलाल अग्रवाल,

मार्च शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील,नरसीलाल अग्रवाल,राजेंद्र गावीत,मनोज अग्रवाल,विजय सोनवणे,अजय कासार,अमोल पाठक,माजी नगरसेवक अजय पाटील,रमला राणा,दुर्गा वसावे यांनी केले.यावेळी रक्तदान शिबिराचे प्रमुख रज्जु अग्रवाल,सहप्रमुख हेमंत जाधव,शाम गावीत,डॉ चंद्रशेखर पाटील,दर्शन दिपक पाटील,जितेंद्र अहिरे,डॉ अमित मावची,संदिप पाटील,रामु गिरासे,अजय अग्रवाल,गोपी सैन,राहुल दुसाने,विकी चौधरी,विशाल पाटील,संदिप चौधरी,घनशाम परमार,बादल अग्रवाल,हेमंत शर्मा आदी उपस्थित.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत गावीत म्हणाले की शेवटचा घटकापर्यंत दवाखान्यात रक्ताची गरज भासत असते.अशा रुग्णाना रक्त देऊन त्यांना जिवदान हे महान दान याठिकाणी होत असते.या कार्यक्रमाचा निमित्ताने सर्वजण आपण एकत्र आलो आहोत हे रक्त कुठल्या जातीचा,कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा व्यक्तीला लागेल हे आपण पण सांगु शक्त नाही.नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल भाग आहे.आणि आदिवासी बहुल समाजा मध्ये सिकलसेलचे प्रमाण आहे.जो सिकल सेल पेशंट असतो त्याला सतत रक्ताची गरज लागत असते.अशा वेळी रक्त पेढी मधुन त्यांना रक्त मिळेल तर त्याचा जिव वाचु शकतो. अशा कार्यक्रमाचा माध्यमातुन रक्त पोहचत असते या देशसेवेला माझा सलाम आहे.
या नंतर मार्च शिक्षण संस्था उपाध्यक्ष अनिल पाटील, मठ मंदीर प्रमुख देवगिरी प्रांत कैलास गायकवाड,विजय सोनवणे,अजय कासार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या नंतर रक्तदान करणारे दात्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार सह प्रमुख हेमंत जाधव यांनी मानले.यावेळी १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले.








