शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ५३२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नांना यश
नंदुरबार | प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व ५०० खाटांच्या रूग्णालयातील विविध बांधकामासाठी ५३२ कोटी ४१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितिच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला आता सुरुवात होणार आहे . खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी सातत्याने शासनाशी पाठपुरावा केल्याने नंदुरबार शासकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध होत आहे .
नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आ.डॉ.विजयकुमार गावीत वैद्यकीय शिक्षणमंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळातच मंजुरी मिळाली होती . नंदुरबार येथीत १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यातयाता याअगोदरच मंजुरी मिळाली होती . मंजुरी मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा , यासाठी खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत शासनाशी सातत्याने पाठपुरावा करत होते . राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितिच्या बैठकीत नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयातील विविध बांधकामासाठी शासनाने ५३२ कोटी ४१ लाखाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.५३२ कोटीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असल्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे . नंदुरबार शासकीय महाविद्यालय व १०० खाटांच्या रूग्णालयातील विविध बांधकाम हे लाख १४६४ चौरस मीटर होणार आहे . खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ. विजयकुमार गावीत यांनी सातत्याने नंदुरबार शासकीय महाविद्यालयाची इमारत बांधकामासाठी निधी मिळावा , यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला, खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ. विजयकुमार गावीत या पिता – पुत्रींच्या प्रयत्नांना यश आले असुन माता लवकरच प्रत्यक्षात नंदुरबार शासकीय महाविद्यालयाची इमारत साकार होणार माहे . नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे १०० विद्यार्थी क्षमतेेचे असुन ५०० खाटांचे रूग्णालय असणार आहे. नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालया बरोबरच सोलापुर जिल्हयातीत बार्शी ग्रामीण रुग्णालयासाठी २० कोटी ८३ लाख , पाली सुधागड ग्रामीण रूग्णालयासाठी २० कोटी २७ लाख , जामखेड ग्रामीण रूग्णालयासाठी ४६ कोटी ९७ लाख , कर्जत उपजिल्हा रूग्णालयासाठी ४४ कोटी ८४ लाखांच्या अंदाजपत्रकाला उच्चाधिकारी समितीने मंजुरी दिली.या बैठकीला वित विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक , सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधीदव्य विभागाचे प्रधान सचिव सोरभ विजय , सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उ.प्र.देबडवार उपस्थित होते .